वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
यजमान न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात 29 मार्चपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ होत आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये नवोदित निक केली आणि मोहम्मद अब्बास या दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
या मालिकेसाठी टॉम लेथमकडे न्यूझीलंड संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. सध्या पाक आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू असून न्यूझीलंडने या मालिकेत पाकवर 3-1 अशी आघाडी यापूर्वीच घेतली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी खेळविला जात आहे. या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा नियमीत कर्णधार मिचेल सँटेनर उपलब्ध होऊ शकणार नसल्याने लेथमकडे कप्तान पदाची जबाबदारी क्रिकेट न्यूझीलंडने सोपविली आहे. नुकत्याच झालेल्या 2025 च्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणाऱ्या न्यूझीलंड संघातील 8 खेळाडूंची पाकविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. रचिन रवींद्र, कॉन्वे, फिलीप्स, सँटनर या मालिकेत खेळू शकणार नाहीत तर संघ निवडीवेळी केन विलियमसन उपलब्ध नसल्याने त्याला संधी मिळाली नाही. मिचेल, ब्रेसवेल आणि स्मिथ यांच्यावर मधल्या फळीची भिस्त राहिल. ओरुरकी, डफी, स्मिथ आणि सीयर्स हे वेगवान गोलंदाज आहेत. अष्टपैलु ब्रेसवेल उपायुक्त फिरकी गोलंदाज आहे. त्याला ऑकलंडच्या आदी अशोकची साथ लाभेल.
न्यूझीलंड संघ: लॅथम (कर्णधार), मोहम्मद अब्बास, आदी अशोक, ब्रेसवेल, चॅपमन, डफी, हे, केली, मिचेल, ओरुरकी, सीयर्स, नाथन स्मिथ आणि यंग
वनडे मालिका कार्यक्रम
पहिली वनडे 29 मार्च -नेपीयर, दुसरी वनडे 2 एप्रिल नेपीयर, तिसरे वनडे 5 एप्रिल माऊंट माँगेनुई









