वृत्तसंस्था / लंडन
ट्रेंट ब्रिज येथे 22 मे रोजी सुरू होणाऱ्या झिम्बाब्वे विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी शुक्रवारी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने 13 सदस्यांचा संघ जाहीर केला असून त्यामध्ये सॅम कुक आणि जॉर्डन कॉक्स या दोन नव्या खेळाडूंना संधी दिली गेली आहे.
2003 नंतर पहिल्यांदाच इंग्लंडच्या भूमीवर झिम्बाब्वेचा संघ पहिली कसोटी खेळत आहे. येत्या उन्हाळी मोसमात इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका आयोजित केली असून या मालिकेला जून 20 पासून प्रारंभ होत आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी निवडण्यात आलेला सॅम कुमक हा वेगवान गोलंदाज असून अलिकडच्या कालावधीत त्याने इंग्लीस कौंटी क्रिकेट स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केली आहे. त्याने प्रथम श्ा़dरेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 318 गडी बाद केले आहेत. नॉटिंगहॅमशायरचा वेगवान गोलंदाज जोश टंगचे इंग्लंड संघात या आगामी कसोटीसाठी पुनरगामन झाले आहे.
इंग्लंड कसोटी संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), अॅटकिनसन, शोएब बशिर, हॅरी ब्रुक, सॅम कुक, जॉर्डन कॉक्स, क्रॉले, डकेट, ऑली पॉप, पॉट्स, रुट, जेमी स्मिथ आणि जोश टंग.









