यापूर्वी तिघांचे मृतदेह सापडले
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे दोन दिवसांपूर्वी तीन जणांचे मृतदेह सापडल्यानंतर, आणखी दोन तरुण बेपत्ता झाल्याची घटना उघड झाली आहे. हे दोघे तरुण कठुआ जिह्यातील राजबाग परिसरातून बेपत्ता झाले आहेत. दिनू (15 वर्षे) आणि रेहमत अली (12 वर्षे) अशी दोघांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यापूर्वी 8 मार्च रोजी जिल्ह्यातील बिलावर भागातील टेकड्यांजवळ तीन बेपत्ता लोकांचे मृतदेह आढळले होते. हे सर्वजण दहशतवादग्रस्त भागातून बेपत्ता झाले होते. या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी परिसरात ग्राम संरक्षण रक्षक (व्हीडीजी) तैनात करण्याबद्दल आणि विशेष ऑपरेशन्स ग्रुप आणि विशेष कार्य दलाच्या पदांची निर्मिती करण्याची सूचना प्रशासकीय विभागाला केली आहे.









