वृत्तसंस्था / चेंगवॉन (कोरिया)
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्व कनिष्ठांच्या नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत शनिवारी भारताच्या नेमबाजांनी आणखी दोन कास्यपदके मिळवली. या स्पर्धेच्या पदकतक्त्यात भारत दुसऱ्या स्थानावर असून चीन पहिल्या स्थानावर आहे.
या स्पर्धेच्या पदकतक्त्यात चीनने 12 सुवर्णासह एकूण 26 पदकाची कमाई करत पहिले स्थान भक्कम केले आहे. भारत 4 सुवर्ण, 5 रौप्य आणि 5 कास्य अशी एकूण 14 पदके मिळवत दुसरे स्थान पटकावले आहे. शनिवारी या स्पर्धेत भारताच्या नेमबाजांनी पुरुष आणि महिलांच्या सांघिक 25 मी. स्टॅण्डर्ड पिस्तूल नेमबाजीत दोन कास्यपदके मिळवली.









