दोन लाख रुपये कुटुंबीयांकडे सुपूर्द
न्हावेली / वार्ताहर
आरोस – नाबरवाडीमध्ये सेवा बजावत असताना विद्युत खांबावर मृत्यू झालेल्या २३ ) यांच्या कुटुंबीयांना अखेर वीज अधिकाऱ्यांनी दोन लाख रुपये मदत दिली. तर उर्वरित मदत पंधरा दिवसाच्या आत दिली जाईल,अशी ग्वाही दिली अमोल कळंगुटकरचा मृत्यू ही दुदैवी घटना आहे.मात्र त्याला न्याय देण्यासाठी एकत्रितपणे लक्ष दिलेल्या हजारो नागरिकांच्या लढ्याला यश येत आहे.
वीजसेवा बजावताना मृत्यू झालेली आरोस गावातील घटना ही जिल्ह्यात सातवी घटना आहे.महावितरणकडून त्यांच्या वारसांना तटपुंजी भरपाई दिली जाते मात्र आरोसमध्ये ग्रामस्थांच्या एकोप्यामुळे भरपाईबाबत वेगळी परिस्थिती पहावयास मिळाली कुडाळ येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रकाश तनपुरे यांनी सांगितल्याप्रमाणे सोमवार १६ रोजी अमोलच्या कुटुंबीयांना दोन लाख कुटुंबीयांना दोन लाख रुपयांचा धनादेश महावितरणकडून कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. स्व.गोपीनाथ मुंडे योजनेमधून दोन लाख रुपये लोकवर्गणीतून एक लाख रुपये असे अजून तीन लाख रुपये अमोल कळंगुटकरच्या कुटुंबीयांना पंधरा दिवसात देणार असल्याची लेखी हमी दिली.तसेच मयत अमोल कळंगुटकर हे पेन्शनची पंधरा हजार रुपये रक्कम मिळवून देणार असल्याचे सांगितले.
या घटनेला कंत्राटदार अरिफ तांबोळी जबाबदार असून त्यांच्या कंपनीला काळ्या यादीत समाविष्ट करण्यासाठी पंधरा दिवसात प्रस्ताव करु, कंत्राटदाराकडून मृतांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करु अमोल कळंगुटकर यांच्या कुटुंबीयांतील एका सदस्याला शासकीय सेवेत घेण्यासाठी पाठपुरावा करु शाखा कार्यालय बांदा २ चे सहाय्यक अभियंता घटनास्थळी व शाखा कार्यालयात उपस्थित नसल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करु अशी लेखी आश्वासने कार्यकारी अभियंता प्रकाश तनपुरे यांनी ग्रामस्थांना दिले आरोस पंचक्रोशी ग्रामस्थांच्या या एकजुटीमुळे मृत अमोल कळंगुटकर व त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला .









