सांगली :
येथील 21 वी सुरज सोळा वर्षाखालील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा यंदा सांगलीत कच्छी जैन भवन येथे एकाच दिवशी पार पडणार आहे. कुपवाड ऐवजी प्रथमच सांगली शहरात या स्पर्धा होणार असून बुद्धिबळाचे माहेरघर आणि प्रत्येक शाळेत बुद्धिबळ या संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार आयोजक नूतन बुद्धिबळ मंडळ, सांगली व महाराष्ट्र चेस असोसिएशनचे पदाधिकारी व प्रवीणशेठ लुंकड, अध्यक्ष सोहन शिरगावकर यांनी केल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी उद्योगपती व नूतन मंडळाचे कार्याध्यक्ष गिरीश चितळे, उपाध्यक्ष चिदंबर कोटीभास्कर, प्रमोद चौगुले, सचिव चिंतामणी लिमये, विश्वस्त रमेश चराटे, खजिनदार स्मिता केळकर, सदस्य सीमा कटमाळे आदी पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
देशातील प्रथमच सर्वाधिक 2 लाख रोख 235 पारितोषिकाची, 65 ट्राफी , 170 मेडलची 16 वर्षाखालील स्पर्धा नूतन बुध्दिबळ मंडळ, सांगली व सूरज फौंडेशन , कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली आहे. या स्पर्धा सांगली डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केल्या असून सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्रेही दिली जाणार आहेत. दि. 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता कच्छी जैन भवन येथे स्पर्धेला प्रारंभ होईल. पहिल्या चार क्रमांकाना अनुक्रमे पंधरा हजार, बारा हजार, दहा हजार, साडेआठ हजार, पाचव्या ते बाराव्या सात ते एक हजार, तेरा ते पंधरा क्रमांकांना अनुक्रमे नऊशे, साडेसातशे, साडेसहाशे असे रोख पारितोषिक तसेच पहिल्या दहांना ट्रॉफी पुढच्यांना मेडेल दिले जाईल. त्याचबरोबर उत्कृष्ठ मुली 10 पारितोषिक 1 ले ते 3रे रु. 600 व ट्रॉफी , 4 थे ते 10 वे 600 रु. व मेडल , इतर राज्यातील खेळाडू यांना 10 पारितोषिक पहिले ते 10 वे 550 व ट्रॉफी, चौथ्याच्या पुढे मेडल , महाराष्ट्रातील खेळाडू ( सांगली जिल्हा सोडून ) 30 पारितोषिके, उत्कृष्ठ सांगली जिल्हा खेळाडूंना 20 पारितोषिके तर 6,8,10,12,14 वयोगटासाठी प्रत्येकी 20 पारितोषिके 1 ले ते 3 रे 500 व ट्रॉफी , 4 थे ते 5 वे रू. 400 व ट्रॉफी , 6 वे ते 20 वे रू. 400 व मेडल अशी बक्षिसे आहेत . तर उत्कृष्ठ अकॅडमी 10 पारितोषिके 1 ते 5 क्रमांकाना रू. 2000 व ट्रॉफी , 6 वे ते 10 वे ट्रॉफी , तसेच उत्कृष्ठ शाळा 1 ले ते 10 वे रू. 1000 व ट्रॉफी अशी पारितोषिके दिली जाणार आहेत.
या स्पर्धेकरीता स्पर्धा फी दि. 15 फेब्रुवारीपर्यत 550 इतकी आहे. त्यानंतर येणा–या प्रवेशिका लेट फी घेऊन स्विकारल्या जातील. असे स्पर्धा संयोजक प्रमोद चौगुले व प्रा. रमेश चराटे यांनी सांगितले आहे.
अधिक माहितीसाठी स्पर्धा संयोजन केपीएस चेस अँकँडमी मो. नं. 8390018308, 7588842605,9423872924 यांचेकडे संपर्क साधावा. या स्पर्धा आयोजनासाठी सूरज फौंडेशनचे सचिव एन.जी.कामत , सूरज स्पोर्टस अँकँडमी इनचार्ज विनायक जोशी , स्कूल कमिटी सदस्या प्राचार्या सौ. संगिता पागनीस , याचबरोबर नूतन बुध्दिबळ मंडळाचे अध्यक्ष सोहन शिरगांवकर, उपाध्यक्ष चिदंबर कोटीभास्कर,मंडळाचे सचिव चिंतामणी लिमये, खजिनदार सौ. स्मिता केळकर, कार्याध्यक्ष गिरीश चितळे, डा. उल्हास माळी, उदय पवार, सौ.सीमा कठमाळे, सौ. माधुरी कात्रे, संजय केडगे, प्रा. अतुल इनामदार, डा. गोविंद कुलकर्णी यांचबरोबर अनेक कार्यकते कार्यरत आहेत.
- सांगली आणि महाराष्ट्राचा लौकिक वाढावा म्हणून प्रयत्न
भारतात बुद्धिबळाच्या बाबतीत तामिळनाडू आणि महाराष्ट्राने आपले नाव चमकत ठेवले आहे. यापुढेही सांगली आणि महाराष्ट्राचा हा लौकिक कायम राहावा असा नूतन बुद्धिबळ मंडळ जिल्हा आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांचा प्रयत्न आहे. शाळा शाळांमध्ये बुद्धिबळ, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, सांगलीतच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिह्यात प्रसार व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच एका दिवसात इतक्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन केले असून 500 खेळाडूंची नोंदणी झाली तरी एका दिवसात वेळेत निकाल लावण्याचे नियोजन केले आहे. अत्यंत व्यावसायिक पद्धतीने आणि प्रत्येक मुलापर्यंत बक्षीस पोहोचून त्यांचा उत्साह वाढेल असे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती गिरीश चितळे, प्रमोद चौगुले, चिदंबर कोटीभास्कर व पदाधिक्रायांनी दिली.








