विजयवाडा / वृत्तसंस्था
आंध्रप्रदेशातील विजयवाडा जिल्हय़ात गांधीनगर येथील जिमखाना मैदानावरील फटाक्मयांच्या स्टॉलला रविवारी सकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. दिवाळी सणानिमित्त मैदानावर फटाक्यांची स्टॉल्स उभारण्यात आली होती. यापैकी एका स्टॉलमध्ये आगीचा भडका उडाल्यानंतर आजुबाजुच्या तीन-चार दुकानांमधील लाखो रुपयांचे फटाकेही जळून गेले. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या दुर्घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसत आहेत. आग दुर्घटनेमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.









