इस्लामपूर :
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कामेरी गावच्या हद्दीत झालेल्या मोटरसायकल अपघातात सर्जेराव सुदाम कांबळे (35 रा. इंग्रुळ ता. शिराळा) व अविनाश सर्जेराव दाभाडे (31 रा. तडवळे)s हे ठार झाले. हा अपघात रविवारी रात्री 11 च्या सुमारास कामेरी हद्दीतील मीरा बारच्या समोर घडला.
सर्जेराव कांबळे व अविनाश दाभाडे हे त्यांच्या ताब्यातील हिरोहोंडा स्प्लेंडर मोटरसायकल (क्र. एम.एच. 10 ई.सी. 9335) वरून विरूध्द दिशेने हायवे रोडने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने जात होते. यावेळी त्यांना अज्ञात वाहनास धडक बसली. या धडकेत सर्जेराव कांबळे व अविनाश दाभाडे यांच्या डोक्यास गंभीर मार लागला. यामध्ये दोघेही ठार झाले. याप्रकरणी दीपक आनंदा कांबळे (रा.इंग्रुळ) यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.








