टाटा मोटर्स शोरूम समोर इनोव्हा कार ,मोटारसायकल आणि डंपर यांच्यात झाला अपघात
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
मुंबई – गोवा महामार्गावर हुमरमाळा येथील टाटा मोटर्स शोरूमच्या समोर सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास झालेल्या दुहेरी अपघातात मोटार सायकल वरील अनुष्का अनिल माळवे ( वय १८ ) रा- (अणाव दाबाचीवाडी) , आणि विनायक मोहन निळेकर ( वय २२) रा- रानबांबुळी हे दोघे युवक युवती डंपर खाली चिरडून ठार झाले . टाटा मोटर्स शोरूमचा सिक्युरिटी गार्ड रोहित कुडाळकर याच्यासह इनोव्हा कारमधील आठ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णाल्यात उपचार सुरू आहेत. टाटा मोटर्स शोरूम समोर इनोव्हा कार ,मोटारसायकल आणि डंपर यांच्यात सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान अपघात झाला. अधिक तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस करत आहेत.









