जत, प्रतिनिधी
Sangli Crime News : जत तालुक्यातील कोसारी येथे शेत जमिनीतील विहिरीच्या पाळीवरून भावकीतीलच कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात दोन जण जागीच ठार झाले तर चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानक घडलेल्या या हल्ल्यामुळे कुंभारी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विलास नामदेव यमगर (वय- 45) व प्रशांत दादासो यमगर (वय -23) या चुलत्या-पुतण्याचा हल्ल्यात जागीच मृत्यू झाला आहे.
तर जखमींमध्ये दादासो नामदेव यमगर, यशवंत भाऊ खटके, विजय विलास यमगर व एका महिलेचा समावेश आहे. या चौघांवर देखील जत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्यासह मोठा पोलीस फाटा कोसारी येथे दाखल झाला आहे. या घटनेने गावात प्रचंड मोठा तणाव निर्माण झाला आहे.
कोसारी पासून पाच किलोमीटर अंतरावर महानोरवाडी येथे यमगर कुटुंबीयांची मोठी शेती आहे. या शेतीतील चार गुंठ्यात असणाऱ्या विहिरीतील पाण्याच्या पाळीवरून हा वाद झाल्याचे समजते. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास यामगर यांच्या भवकितीलच संशयित दहा ते बारा हल्लेखोरांनी यमगर कुटुंबावर तलवार, चाकू , कुऱ्हाड , दगड, दांडक्यांनी जोरदार हल्ला केला. यात दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले. घटनेनंतर आरोपींनी पलायन केले आहे. पोलीस तपासाची चक्री गतीने फिरवत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








