वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इराणमध्ये होणाऱया आगामी कनिष्ठाच्या विश्व कबड्डी चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी भारताच्या कनिष्ठ मुलांच्या संघामध्ये दोन युवा कबड्डीपटूंचा समावेश करण्याकरिता दिल्ली उच्च न्यायालयाने खास परवानगी दिली आहे.
इराणमध्ये होणाऱया या आगामी कनिष्ठाच्या विश्व कबड्डी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघामधील दोन कबड्डीपटूंना दुखापत झाल्याने त्यांनी माघार घेतली. त्यानंतर 17 वषीय रोहित कुमार आणि 19 वषीय नरेंदर यांना भारताच्या संघामध्ये समावेश करण्याकरिता दिल्ली उच्च न्यायालयाने खास परवानगी दिली आहे. या स्पर्धेसाठी अखिल भारतीय कबड्डी संघटनेचे प्रशासक आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाकडून दाखल झालेल्या अर्जावर सुनावणी चालू होती. या सुनावणीमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्या. प्रतिभा एम. सिंग यांनी रोहित कुमार व नरेंदर यांना भारतीय कनि÷ कबड्डी संघात स्थान देण्याचा निर्णय दिला आहे. इराणमधील कनि÷ांची विश्वचषक कबड्डी स्पर्धा 26 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान होणार आहे.









