वृत्तसंस्था/ जपान
जपानमधील सुपर फेदरवेट बॉक्सर शिगेतोशी कोटारी आणि लाईटवेट बॉक्सर हिरोमासा उराकावा, दोघेही 28 वर्षांचे, 2 ऑगस्ट रोजी टोकियोच्या कोराकुएन हॉलमध्ये एकाच कार्डवर लढतवेळी शिगेतोशी कोतारीने सहकारी जपानी फायटर यामातो हाताविरुद्ध 12 फेऱ्यानंतर बरोबरी साधली होती. त्यानंतर लगेचच तो बेशुद्ध पडला आणि 8 ऑगस्ट रोजी त्याचे निधन झाल्याचे एम.टी. बॉक्सिंग जिमने शनिवारी त्यांच्या सेशल मिडीयावर सांगितले.
टोकियोमध्ये एकाच कार्यक्रमादरम्यान वेगवेगळ्या लढतींमध्ये झालेल्या मेंदूच्या दुखापतीमुळे जपानमधील या दोन बॉक्सर्सचा दुर्दैवी मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 28 वर्षीय शिगेतोशी कोटारी आणि हिरोमासा उराकावा, दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रियाही करण्यात आली. यामातो हाताविरुद्ध 12 फेऱ्यांची लढत बरोबरीत राहिल्यानंतर कोटारी लगेचच बेशुद्ध झाला आणि नंतर त्याचे निधन झाले. वर्ल्ड बॉक्सिंग ऑर्गनायझेशनने रविवारी सांगितले की, योजी सैतोविरुद्धच्या आठव्या आणि शेवटच्या फेरीत उराकावाला थांबवण्यात आले आणि या लढतीवेळी झालेल्या दुखापतींमुळे त्याचेही दुर्दैवाने निधन झाले.









