पुलाची शिरोली /वार्ताहर
धारदार शस्त्राने वार करुन पुलाची शिरोलीतील दोघे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. विजय बाबासो थोरवत व संजय परशराम थोरवत अशी जखमींची नावे आहेत. याबाबत घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी, थोरवत काॅलनीतील विजय बाबासो थोरवत, संजय परशराम थोरवत हे राहतात. शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शुभम गव्हाणे, दिपक सिकंदर जानराव आणि अन्य अनोळखी दोन युवक विजय थोरवत यांच्या दारात आपापसात अश्लील शिवीगाळ करून भांडत होते. यावेळी विजय थोरवत यांनी आपल्या दारात थांबू नका असे सांगितले.
दरम्यान, विजय थोरवत यांच्या दारामध्ये फरशी बसवण्याचे काम सुरू होते. विजय थोरवत आणि त्यांचे चुलते संजय थोरवत हे त्या ठिकाणी काम पाहत थांबले होते. यावेळी वरील कारणावरून मनात राग धरून शुभम गव्हाणे व दिपक जानराव आणि अन्य दोघेजण विजय थोरवत यांना शिवीगाळ आणि लाथा बुक्क्याने मारहाण करू लागले. त्यातील एकाने धारदार शस्त्राने विजय यांच्या पाठीवर, डाव्या खांद्यावर, डाव्या डोळ्याजवळ, उजव्या हाताच्या अंगठ्या जवळ वार करून जखमी केले.
यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या संजय परशराम थोरवत यांच्या मानेवरही धारदार शस्त्राने वार करण्यात आले. मारहाण करून संशयित आरोपीने पलायन केले. जखमींना तात्काळ उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद
शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील तपास करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









