दापोली प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील ताडील सुरेवाडी येथील रहिवासी शंकर रहाटवळ(वय ७४) व बबन रहाटवळ (वय ६२) हे दोघे जंगली डुकराने केलेल्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
यातील शंकर रहाटवळ यांची प्रकृती चिंताजनक आहे. दोघेही आपली गुरे जंगलातून गावाकडे घेऊन येत असता सोमवारी सायंकाळी गावालगत असलेल्या प-यांमध्ये बसलेल्या डुकराने त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला. बबन रहाटवळ हे झाडावर चढून बसल्याने यातून बचावले आहेत. त्यांच्या किडनीला दुखापत झाली आहे. तर शंकर रहाटवळ हे जबर जखमी झाले आहेत.









