प्रतिनिधी/ बेळगाव
बेनकनहळ्ळीजवळ भरधाव कारने दुचाकीला ठोकरल्याने दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. या अपघातानंतर कार रस्त्याशेजारी ख•dयात उलटली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे.
रामलिंग मोहन पाटील (वय 28), नरेश परशराम देसूरकर (वय 34, दोघेही रा. बेनकनहळ्ळी) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. कार चालकाविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









