वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटच्या ऑफिस ऑफ फॉरेन असेट कंट्रोलने (ओएफएसी) सादिक अब्बास हबीब सय्यद आणि खिजार मोहम्मद इक्बाल शेख या दोन भारतीय नागरिकांसह भारतस्थित ऑनलाइन फार्मसी- केएस इंटरनॅशनल ट्रेडर्सवर बनावट औषधे पुरविल्याचा आरोप केला आहे. त्यांच्यावर अमेरिकेला फेंटानिल आणि इतर बेकायदेशीर औषधे असलेल्या लाखो बनावट प्रिक्रिप्शन गोळ्या पुरवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सय्यद आणि शेख यांनी ही औषधे विकण्यासाठी एक्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर केला.
खिजार शेख हा केएस इंटरनॅशनल ट्रेडर्सचा मालक असून तो ऑनलाइन फार्मसीस्ट म्हणून काम करतो. आरोप असूनही शेखने आपले दुकान बंद केले नाही असा आरोप आहे. त्यांच्याकडून पुरविण्यात आलेली बनावट औषधे ऑक्सिकोडोन, अॅडेरॉल आणि झॅनॅक्ससारख्या लोकप्रिय औषधांप्रमाणे विकली जात होती. परंतु त्यात फेंटानिल, फेंटानिल अॅनालॉग्स आणि मेथाम्फेटामाइनसारखे धोकादायक पदार्थ असल्याचा दावा ट्रेझरी डिपार्टमेंटने केला आहे.









