सावंतवाडी / प्रतिनिधी
Two goats caught by a leopard!
नेमळे एरंडवाकवाडी येथील शेतकरी गुंडू अनंत कोरगांवकर यांच्या राहत्या घराशेजारील गोठ्यात रात्रौ-१.००वा.सुमारास बिबट्या घूसून त्याने दोन शेळ्या फस्त केल्या असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अलीकडेच कोरगांवकर यानी शेतीव्यवसायाला पूरक म्हणून शेळीपालन करण्याचे ठारविले यासाठी त्यांनी कर्ज घेऊन १५०० हजार एवढया किमतीला दोन शेळ्या विकत घेतल्या होत्या मात्र बिबट्याने दोन्ही शेळ्या गोठ्यातच मारुन त्यापैकी एक जंगलात पळवून घेऊन गेला .यामुळे नेमळे गावातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे .याविषयी वनविभागाचे वनरक्षक पाटिल ,बबन रेडकर पशुवैद्यकिय अधिकारी धनंजय कुठार याना कळविताच घटना स्थळाची पाहणी करुन पंचनामा केला .याची नुकसानभरपाई लवकरातलवकर मिळवून द्यावी अशी मागणी नुकसान ग्रस्थ शेतकरी गुंडू कोरगांवकर यानी वनविभागाकडे केली आहे .तसेच गोठ्यात घूसून जनावरे फस्त करणाऱ्या बिबट्याचा त्वरीत बन्दोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे यावेत वनरक्षक रमेश पाटील ,बबन रेडकर,पशुवैद्यकिय अधिकारी धनंजय कुठार तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.