कृषी मंत्री रवी नाईक यांच्याहस्ते उद्घाटन
फोंडा : फोंडा तालुक्यात नियमित कचऱ्याची उचल कण्यासाठी फोंडा पालिकेच्या ताफ्यात दोन कचरावाहू वाहने जोडण्यात आलेली आहे. फोंडा शहर स्वच्छ राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन कृषीमंत्री रवी नाईक यांनी केले. फोंडा शहरातील कचरा उचल करण्यासाठी फोंडा पालीकेतर्फे खरेदी करण्यात आलेल्या कचरावाहू वाहनांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून दोन कचरावाहू वाहनाची खरेदी सुमारे 21 लाख 38 हजार रूपये खर्चुन करण्यात आलेली आहे. यावेळी पालीकेचे नगराध्यक्ष रितेश रवी नाईक, नगरसेवक रूपक देसाई, गीताली तळावलीकर, ज्योती नाईक,आनंद नाईक, पालीका मुख्याधिकारी शुभम नाईक व नागरिक उपस्थित होते. पालीका समोरील उद्यानाचे येत्या दिवसात नुतनीकरण होणार आहे. त्यासंबंधी आवश्यक सोपस्कर पुर्ण करण्यात आलेले असून नजीकच्या काळात हे काम सुरू करण्यात येणार आहे. पालीका इमारतीसमोरील उद्यानाबरोबर सर्व उद्यांनाच्या नुतनीकरणासाठी कार्यवाही होत असून मागच्या काळात काही उद्यानांचे नुतनीकरण झाले आहे. कचरा उचलण्यासाठी त्वरीत कार्यवाही फेंडा पालीका क्षेत्रातील कचरा उचलण्यासाठी त्वरीत कार्यवाही केली जात असून घरोघर कचरा उचलण्यासाठीच्या कंत्राटाची मुदत येत्या सप्टेबर महिन्यात संपत असल्याने नवीन कंत्राटासंबंधी आवश्यक ठराव घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी दिली.









