वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा 17 वर्षाखालील वयोगटातील पुरुषांचा फुटबॉल संघ चीनच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात चीनच्या 17 वर्षाखालील वयोगटातील संघाबरोबर 2 मित्रत्वाचे फुटबॉल सामने आयोजित केले आहेत.
8 आणि 10 ऑक्टोबरला हे दोन मित्रत्वाचे फुटबॉल सामने होणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली आहे. अलिकडेच भारताच्या 17 वर्षाखालील वयोगटाच्या फुटबॉल संघाने गेल्या आठवड्यात सॅफ फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. भारतीय फुटबॉल संघ सोमवारी बिझिंगला प्रयाण करणार आहे.









