12 डबे ऊळावरून घसरले
वृत्तसंस्था /कोलकाता
पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्यानंतर अनेक डबे ऊळावरून घसरले. ही घटना रविवारी पहाटे चार वाजता बांकुराजवळील ओंडा स्थानकात घडली. या घटनेत मालगाडीचा चालक जखमी झाला आहे. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मालगाडीने दुसऱ्या मालगाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला आहे.

हा अपघात कसा आणि कशामुळे झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, पश्चिम बंगालमधील काही भागात रेल्वेसेवा प्रभावित झाली आहे. अलीकडेच ओडिशातील बालासोरमध्ये मालगाडी आणि दोन प्रवासी रेल्वेंमध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातात जवळपास 275 हून अधिक प्रवाशांचा बळी गेला होता. त्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये झालेल्या मालगाड्यांच्या धडकेत जवळपास 12 डबे ऊळावरून घसरले आहेत. मात्र सुदैवाने या भीषण अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.









