ओटवणे प्रतिनिधी
जिल्ह्यात मध्यान्ह भोजन योजना सुरु
Two free meals for registered unorganized workers
नोंदणीकृत असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने मध्यान भोजन योजनेअंतर्गत दोन वेळचे मोफत जेवण दिले जाणार असून जिल्ह्यात या योजनेला प्रारंभ झाला आहे. बांधकाम व इतर क्षेत्रातील नोंदणीकृत कामगारांच्या भोजनासाठी ग्रामपंचायतीने मागणी केल्यानंतर या कामगारांना दुपारचे आणि रात्रीचे दोन वेळचे मोफत भोजन दिले जाणार आहे. कुडाळ येथील मध्यान भोजन किचनमधुन टेम्पोद्वारे जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगारांना गावोगावी मोफत भोजनाचे डबे वितरीत केले जाणार आहे.
सावंतवाडी तालुक्यात शिरशिंगे, माजगाव, वेर्ले, सांगेली, कोलगाव येथे यायोजनेचा शुभारंभ करण्यात आला. कोलगाव येथे नोंदणीकृत कामगारांना भोजन वितरणप्रसंगी कोलगाव सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, माजी सरपंच संदीप हळदणकर, ग्रामपंचायत सदस्य रोहित नाईक, आत्माराम चव्हाण, प्रणाली टिळवे, रसिका करमळकर, हेमांगी मेस्त्री, सलाम शेख, बाळा राऊळ आदी उपस्थित होते.









