मानवी शरीर ही परमेश्वराची अद्भूत निर्मिती आहे. याचा प्रत्यय अनेकदा आश्चर्यकारक अशा घटनांमधून येत असतो. ब्राझिल या देशामध्ये एका महिलेने जुळय़ा मुलांना जन्म दिला. सर्वसाधारणपणे जुळय़ा मुलांचा पिता एकच पुरुष असतो. पण या महिलेच्या जुळय़ा मुलांची डीएनए चाचणी केली असता दोघांचेही पिते भिन्न भिन्न असल्याचे आढळून आले. यावेळी महिलेसह डॉक्टरांना आणि साऱयांनाच आश्चर्याचा धक्का बसला. असे कसे शक्मय आहे, असाच प्रश्न साऱयांच्या मनात होता. हा दैवी चमत्कार म्हणावा की वैज्ञानिक सत्य म्हणावे, असा संभ्रम सर्वांनाच पडला होता. डीएनए चाचणीवरही संशय व्यक्त करण्यात आला.
तथापि, संशोधनाअंती ही बाब सत्य असल्याचे अंतिमरीत्या आढळून आले. कोटय़वधी बाळंतपणांमधून अशी घटना एखाद्या वेळेस घडू शकते. हा चमत्कार नसून अशा घटना वैज्ञानिकच असतात. विज्ञानाच्या परिभाषेत याला ‘हेट्रोपेरेंटल सुपरफेक्मयुडेशन’ असे संबोधले जाते. एखाद्या महिलेचा एक-दोन दिवसांच्या अंतरात दोन पुरुषांची शरीरसंबंध आल्यास त्या दोघांपासूनही तिला एकाच वेळी दिवस जाण्याची शक्मयता असते. आतापर्यंतच्या इतिहासात अशी 20 प्रकरणे आढळून आली आहेत. ही माता 19 वर्षांची आहे. पहिली डीएनए टेस्ट करण्यात आली तेव्हा या महिलेच्या पतीशी एका मुलाचे डीएनए जुळून आले. पण दुसऱया मुलाची चाचणी अपयशी ठरली. त्यावेळी या महिलेला आपले दुसऱया पुरुषाशी शरीरसंबंध आल्याची आठवण झाली. त्यामुळे त्या पुरुषाबरोबर दुसऱया मुलाचे डीएनए जुळवून पाहण्यात आले आणि दुसऱया पित्याचा पत्ता लागला.
अशातऱहेच्या घटना माणसांमध्ये अत्यल्प प्रमाणात घडत असतात. तथापि, कुत्री, मांजरे किंवा एखाद्या अन्य प्राण्यांमध्ये असे वारंवार घडताना दिसलेले आहे. अशाप्रकारची गर्भधारणा झाल्यास महिलेचे बाळंतपण सुखरुप होणे अत्यंत कठीण असते. बऱयाचदा गर्भपात होण्याच्या घटना घडतात. तथापि, ही महिला सुदैवी ठरली आहे.









