वास्को : काल मंगळवारी दुपारी उशिरापर्यंत रंगपंचमी साजरी करून इतर युवकांसोबत समुद्रात उतरलेल्या दोघांचा बुडून अंत झाला. हेडलँड सड्यावरील समुद्रात तसेच बायणातील समुद्रातील या घटना दुपारी अडिच ते तीनच्या दरम्यान घडल्या. एका युवकाची ओळख पटली आहे तर दुसऱ्या व्यक्तीची संध्याकाळपर्यंत ओळख पटली नव्हती. वास्को व मुरगावात मंगळवारी रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. उत्साहा दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडली नाही. मात्र, उत्सवातील उत्साह ओसरल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास दोघांचा बडुन मृत्यू होण्याची घटना घडली. बुडालेल्या एकाचे नाव शुश्रुत सातार्डेकर (18 वर्षे) असे असून तो हेडलँड सड्यावरील राहणारा आहे. रंग खेळून झाल्यानंतर तो इतर युवकांबरोबर सड्यावरील जॅपनीज गार्डनखालील समुद्रात आंघोळीसाठी उतरला होता. समुद्रात आंघोळीची मजा लुटताना लाटांबरोबर तो गटांगळ्या खाऊ लागला. तो बुडत असल्याचे दिसून येताच काहींनी त्याला समुद्रातून बाहेर काढले. अत्यवस्थ स्थितीत त्याला चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता मृत घोषीत करण्यात आले. अशाच प्रकारे बायणा किनाऱ्यावरूनही अंदाजे चाळीस वर्षे वयाची एक व्यक्ती आंघोळीसाठी समुद्रात उतरली होती. या व्यक्तीलाही बुडून मृत्यू आला, पण मृतदेह हाती लागला तरी त्याची ओळख रात्री उशिरापर्यंत लागू शकली नव्हती. या दोन्ही घटनांची नोंद मुरगाव पोलीस स्थानकात झालेली आहे. दोन्ही मृतदेह हॉस्पिसियो शवागृहात पाठवण्यात आले आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Previous Articleहरमलात पावणेतीन लाखांचा चरस जप्त
Next Article राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या तयारीवर ‘आयओए’ समाधानी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









