इंडी तालुक्यातील लचयाना गावातील घटना
विजापूर : विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील लचयाना गावात रथोत्सवादरम्यान अपघात झाला असून, यामध्ये दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना इंडी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. गावचे आराध्य दैवत श्री सिद्धलिंग महाराजांच्या कमारी मठाच्या जत्रेत ही दुर्घटना घडली. श्री सिद्धलिंग महाराजांचा रथोत्सव आज झाला. यात हजारो लोक सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत रथाचे चाक धडकल्याने दोघांचा मृत्यू झाला. गंभीर जखमीला जिल्हा ऊग्णालयात हलवण्यात आले आहे. बंडू कटकडोंडा (वय 35) आणि सोबू शिंदे (वय 55) यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.









