उप्पार गल्ली, खासबाग येथील घटना
बेळगाव : उप्पार गल्ली, खासबाग येथील गणेशोत्सव मंडळाला यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर तरुणांनी आतषबाजी करून पालखी सोहळ्यातून श्रींचे स्वागत केले. इलेक्ट्रॉनिक स्पायरो रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने आतषबाजी करताना शॉर्टसर्किट झाले. हा प्रकार निदर्शनास येताच कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला. त्यावेळी प्रसंगावधान राखून सोहम शिवाजी धामणेकर व अथर्व उमेश हलगेकर या दोन लहान मुलांनी मंडपावर चढून ओल्या फडक्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. वेळीच हा प्रकार लक्षात येऊन या मुलांनी आग विझविल्याने अनर्थ टळला. गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या मुलांचे कौतुक केले आहे.









