न्हावेली येथील घटना
न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथे शाळेत सरस्वती पूजनाचे कार्यक्रम पाहताना दोघां मुलांचा भटक्या कुत्र्याने चावा घेतला. कुमारी अनिका भारद्वाज वय ५ वर्षे आणि विलास मुळीक अशी त्यांची नावे आहेत . सायंकाळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांना अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले उपआरोग्य केंद्रात औषधोपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले.
दरम्यान तोच कुत्रा निरवडे येथे जाऊन मातोंडकर नाम व्यक्तीला चावल्याचे समजते आजच्या दिवसात कुत्र्याने चावा घेण्याची ही तिसरी घटना आहे तरीही शासन याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.









