प्रतिनिधी /बेळगाव
गांजा विकणाऱया दोघांना कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. काळी आमराई परिसरातील खैबर हॉटेलजवळ सोमवारी ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याजवळून 1 किलो 705 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी ही माहिती दिली. अटक केलेल्या दोघा जणांकडून 27 हजार 424 रुपये किमतीचा गांजा, एक दुचाकी, मोबाईल संच, रोकड असा एकूण 1 लाख 28 हजार 780 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
प्रदीप लवकुश हुब्बळ्ळी (वय 27, रा. जेड गल्ली, शहापूर), विजयकुमार वीरभद्राप्पा तांडूर (वय 25, मूळचा रा. गुळेदगुड्ड, जि. बागलकोट, सध्या रा. जेड गल्ली, शहापूर) अशी त्यांची नावे आहेत. काळी आमराई परिसरात गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी प्रदीप व विजयकुमार या दोघा जणांना अटक करून गांजासाठा जप्त केला.









