बँक ऑफ इंडियाच्या कारवांचीवाडी शाखेला २२ लाखांचा चुना लावल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. आता पुन्हा आणखी मोठा गैरप्रकार उघड झाला आहे . बँक ऑफ इंडियाच्या मिरजोळे एमआयडीसी व शहर शाखेला फसवणूक करणाऱ्या टोळीने ५० लाख व ५८ लाख असा एकूण १ कोटी ८ लाख रूपयांचा गंडा घातल्याचे समारे आले आहे. या प्रकरणी ग्रामीण व शहर पोलिसांकडून १० पेक्षा अधिक संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. शाखेला गंडा घालणाऱ्या टोळीनेच हे गैरप्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जात ाहे.
बँकेचा रजिस्टर सोनार असलेल्या प्रदीप श्रीपाद सागवेकर (कणनगर रत्नागिरी) याने बनावट दागिन्यांना खरे प्रमाणपत्र दिले होते. या माध्यमातून संशयितांनी डिसेंबर २०१८ ते २१ २०२२ एमआयडीसी शाखेतून ५० शहरातील शाखेमधून ५८ लाख रुपयांचे बनावट सोने तारण ठेवून घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी बँकेच्या व्यवस्थापक रश्मी दिनेश कुजुर (५४, शिवाजीनगर रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सोनारासह १० संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
संशियतांची नावे
प्रदीप श्रीपाद सागवेकर, सलीम हुसेन निंबल (रा. कोकणनगर रत्नागिरी), आकाशानी जनार्दन कांबळे, जनार्दन कांबळे, तेजस्विनी जनार्दन कांबळे (तिघे रा. कारवांचीवाडी रत्नागिरी), सखाराम मयेकर (रा. पोमेंडी रत्नागिरी), नमिता इंदुलकर संतोष सदाशिव शिंदे (रा. मजगांव रोड रत्नागिरी), गणेश बाबाजी आंब्रे (रा. कोकणनगर रत्नागिरी), त्रबन्ना बिस्त्रल (रा. किर्तीनगर रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत.
अशी केली फसवणूक
सलीम याने ३१ डिसेंबर २०१८ रोजी बनावट दागिने गहाण ठेवून १ लाख ५० हजार घेतले होते. पुन्हा त्य़ांनी ७ फेब्रुवारी २०१९ रोजी २ लाख ४० हजार कर्ज घेतले. तर आकाशानी कांबळे हिने ११ लाख ७० हजार, शुभम कांबळे याने २१ मार्च २०२२ रोजी १ लाख ३५ हजार, जयवंत मयेकर याने १७ फेब्रुवारी २०२२ रोजी ४ लाख ५० हजार, नमिता इंदुलकर हिने २७ डिसेंबर २०२१ रोजी ४ लाख ५२ हजार व २१ एप्रिल २०२२ रोजी ५ लाख ६४ हजार कर्ज घेतले. गणेश आंब्रे याने ३० नोव्हेंबर २०२१ रोजी ४ लाख ४० हजार, संतोष शिंदे याने १९ एप्रिल २०१९ रोजी ४ लाख ९९ हजार, तेजस्विनी कांबळे हिने २ मे २०२२ रोजी ३ लाख ३० हजार रुपये तर बन्ना याने २१ मार्च २०२२ रोजी ५ लाख ५० हजार अशी फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे.
Previous Articleशिंदेंचा आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचा संकल्प ठरतोय फोल, 23 दिवसातच 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
Next Article Kolhapur : महापालिकेच्या 12 प्रभागात ‘महिलाराज’









