वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले शहराचे माजी नगराध्यक्ष नाथा सावंत-मांजरेकर यांच्या लता गुड्स ट्रान्सपोर्ट मधुन वेंगुर्ले तालुक्यातून सर्वप्रथम ६ डझनी दोन हापुस आंबा पेट्या नवी मुंबई वाशी मार्केटला गुरूवारी रवाना झाल्या आहेत. वेंगुर्ले शहरातील आंबा बागेत तयार झालेल्या या हापुस आंबा पेट्या प्रथमच वाशी मार्केटला रवाना करताना आंबा पेट्यांसमवेत सामाजिक कार्यकर्ते प्रितम सावंत, कैतान अरावुज, नवनाथ सावंत, राजवीर सावंत आदी उपस्थित होते.









