खानापूर/ प्रतिनिधी : खानापूर जांबोटी रस्त्यावर गांजा विकत असल्याची माहिती खानापूर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच खानापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश शिंगें आपल्या फौज फाट्यासह जांबोटी रस्त्यावर जात होते. यावेळी रामगुरवाडी जवळ एका चार चाकी गाडीतून गांजा विकत असल्याचे दिसून आले. गाडीसह दोघांना ताब्यात घेऊन तपासणी केली. त्यांच्याजवळ अर्धा किलो गांजा सापडला, गांजासह दोन लाख कीमंतीची चार चाकी जप्त करण्यात आली आहे. यात नारायण अमृत पाटील राहणार दुर्गानगर, खानापूर तसेच आली हैदर शहा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई बैलगाडीवायएसपी खडकी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









