कोल्हापूर :
राजारामपुरी पोलिसांनी मोपेडवऊन गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तऊणांना पकडून अटक केली. सुदर्शन मनोज हवालदार (वय 19, रा. पंत मंदिरामागे, 14 वी गल्ली, राजारामपूरी, कोल्हापूर), मोहम्मद तोहीदवालम सिद्दिकी (वय 26, रा. नांदणी नाका, संभाजीपूर, जयसिंगपूर, ता. शिरोळ) अशी त्याची नावे आहेत. त्याच्याकडून 1 हजार 754 ग्रॅम वजनाचा गांजा आणि दोन मोपेड असा 1 लाख 83 हजार 850 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
राजारामपुरी पोलिसांना एक अल्पवयीन तऊण गांजा सेवन करीत असताना मिळून आला. त्याला ताब्यात घेवून पोलिसांनी त्याच्याकडे गांजा कोठून आणि कोणाकडून आणला. याविषयी चौकशी सुऊ केली. चौकशीदरम्यान त्याने राजारामपूरीतील 4 वी गल्लीमध्ये असलेल्या पंत मंदिरामागे राहणारा सुदर्शन हवालदार याच्याकडून विकत आणल्याचे सांगतिले. त्यावऊन पोलिसांनी त्याचा शोध सुऊ याचदरम्यान तो शिवाजी विद्यापीठ परिसरातल्या बस थांब्यानजीक मोपेडवऊन गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती बातमीदाराकडून समजली. त्यावऊन त्या ठिकाणी सापळा रचून त्याला मोपेडसह पकडले. मोपेडची तपासणी केली असता मोपेडेच्या डिक्कीत 820 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आल्याने, त्याला अटक करीत, मोपडे व गांजा जप्त केला.
या कारवाईदरम्यान राजारामपूरी पोलिसांना सरनोबतवाडी ते केएसबीपी चौक जाणाऱ्या रस्त्यावरील बंद पडलेल्या टोल नाक्यानजीक एक तऊण मोपेडवऊन गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावऊन पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून मोहम्मद सिद्दिकी याला पकडले. त्याच्या मोपडेच्या डिक्कीमध्ये 934 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आल्याने, त्याला अटक करीत, मोपेड आणि गांजा जप्त केला.








