मार्केट पोलिसांची कारवाई, ऑटोरिक्षा जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
ऑटोरिक्षात बसून गांजा विकणाऱ्या दोन तरुणांना मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी जुन्या भाजीमार्केटजवळ ही कारवाई करण्यात आली असून या जोडगोळीकडून 550 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
शुभम नारायण लंगरकांडे (वय 25, रा. मारुती रोड, जुने गांधीनगर), फैरोज आलम इसराअहम्मद मंगसुळे (वय 27, रा. महावीरनगर, दुसरा क्रॉस, बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर, उपनिरीक्षक हुसेनसाब केरुर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
शुभम व फैरोज यांच्यावर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गांजा विक्रीसाठी वापरण्यात आलेली केए 22 डी 5549 क्रमांकाची ऑटोरिक्षा व 550 ग्रॅम गांजा असा एकूण 1 लाख 5 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.









