प्रतिनिधी /मडगाव
बाणावली येथील नव्या महामार्गाजवळ कोलवा पोलिसांनी घातलेल्या धाडीत अडीच किलो गांजा जप्त करण्यात आला. बांदफोळ -चिंचोणे येथील महम्मद अख्तर मांडोळ या 23 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
या आरोपीची पोलिसानी झडटी घेतली तेव्हा त्याच्याकडे वैध कागदपत्रे नसल्याने 2.502 किलो गांजासदृष्य पदार्थ जप्त करण्यात आला. बाजारात या पदार्थाची किंमत 2,50,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी कोलवा पोलिसांनी या आरोपीविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायदा-1985च्या 20 (ब) (2) (ब) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.









