वापर करण्यावर येणार मर्यादा, सदस्यताही निश्चित होणार : मस्क यांची कर्मचाऱयांसोबत बैठक
न्यूयॉर्क
लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचा वापर करण्यासाठी सर्व ग्राहकांना शुल्क भरावे लागेल. प्लॅटफॉर्मच्या अहवालानुसार, कंपनीचे नवीन बॉस एलॉन मस्क सबक्रिप्शन शुल्क आकारण्याची योजना आखत आहेत. अहवालात म्हटले आहे की मस्क यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कर्मचाऱयांसोबत या कल्पनेवर चर्चा केली.
वापरकर्त्यांना मर्यादित काळासाठी मोफत ट्विटरचा वापर करता येईल. यानंतर, तुम्हाला ट्विट करण्यासाठी सदस्यता घ्यावी लागेल. मात्र, याला किती वेळ लागेल हे आता सांगणे कठीण आहे. मस्क यावर गांभीर्याने काम करत आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अहवालात म्हटले आहे की कंपनीची टीम सध्या नवीन व्हेरिफिकेशन सबक्रिप्शन फीचरवर काम करत आहे.
सदस्यता मोडवर स्विच करण्याची 3 कारणे
1.
कंपनीला दररोज 32 कोटींचा तोटा होत आहे. त्यांना नवीन मॉडेल्ससह महसूल वाढवायचा आहे.
2.
मस्कने ट्विटर 44 बिलियन डॉलरला विकत घेतले. त्यांना लवकरच त्याची भरपाई करायची आहे.
3.
ट्विटर खूप कर्जात आहे. ते भरुन काढण्यासाठी जाहिरातदारांवर अवलंबून राहू इच्छित नसल्यचेही त्यांनी म्हटले
आतापर्यंत 2 मोठे बदल केले
जवळपास निम्म्या कर्मचाऱयांना कॉस्ट कटिंगसाठी काढून टाकण्यात आले आहे. छाटणीनंतर, मस्क म्हणाले, जेव्हा कंपनी दररोज 4 दशलक्ष डॉलर (32.77 कोटी रुपये) गमावत आहे, तेव्हा आमच्याकडे कर्मचाऱयांना काढून टाकण्याशिवाय पर्याय नाही, हे मस्क यांनी स्पष्ट केले आहे.
ट्विटरमध्ये 5 संभाव्य बदल आहेत
1. सुपर ऍप तयार करण्याची योजना
एलॉन मस्क यांना ट्विटरला ‘सुपर ऍप’ बनवायचे आहे. निर्माते याद्वारे पैसे कमवू शकतील आणि वापरकर्ते पेमेंट करू शकतील, खरेदी करू शकतील आणि टॅक्सी बुक करू शकतील.
2. प्रीमियम सदस्यता
मस्कने ट्विटरच्या गुंतवणूकदारांसोबत आधी स्पष्ट केले होते की प्रीमियम सबक्रिप्शन पर्याय वापरकर्त्यांना दिला जाईल. याद्वारे कंपनीचे जाहिरात महसूलावरील अवलंबित्व कमी होईल.
3. मुक्त भाषण
मस्क यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ते ट्विटरला मुक्त भाषण व्यासपीठ बनवतील. याशिवाय, कंटेंट मॉडरेशन पॉलिसी देखील बदलू शकतात असे सूचित केले होते.
4. क्रिप्टो मार्केटसाठी प्लॅटफॉर्म
मस्क ट्विटरद्वारे क्रिप्टोकरन्सीसाठी संभाव्य लॉन्चपॅड तयार करण्याची तयारी करत आहे. मस्क टेस्लाच्या ताळेबंदीवर क्रिप्टो ठेवतो व त्यावर पेमेंटही स्वीकारतो.
5. डाटा चीनकडे जाण्याचा धोका
मस्क आणि टेस्ला चीनमध्ये आपला व्यवसाय वाढवत आहेत. तज्ञांचे मत आहे की संबंध सुधारण्यासाठी मस्क ट्विटरचा डाटा चीन सरकारसोबत शेअर करू शकतात.









