ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘ट्विटर’ आता अकाऊंट सेफ्टीसाठीही शुल्क आकारणार आहे. फक्त ब्लू टिक वापरकर्त्यांना मेसेजद्वारे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) वापरण्याची मुभा मिळेल. इतर वापरकर्त्यांना या सुविधेसाठी शुल्क द्यावे लागेल. कंपनीने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली.
टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) मुळे अकाऊंटला पासवर्ड व्यतिरिक्त आणखी एक सुरक्षा मिळते. यामुळे वापरकर्त्यांशिवाय इतर कोणीही ट्विटर अकाऊंट ॲक्सेस करू शकत नाही. 2FA मध्ये ट्विटर लॉगिन मेल किंवा मोबाईलवर मेसेज येतो. ज्यांच्याकडे ट्विटर ब्लू टिक अकाऊंट नाही, त्यांचे खाते सुरक्षित करण्यासाठी 2FA हा एक उत्तम मार्ग आहे. मात्र, त्यासाठी 20 मार्चपासून पैसे मोजावे लागणार आहेत.









