Twitter : ट्विटरने कंपनीने ‘ट्विटर सर्कल’ नावाचं एक नवीन फीचर आणले आहे. याबाबत स्वत: कंपनीने ट्विट करत माहिती दिली आहे. या फीचर अंतर्गत यूजर्स आता प्रायव्हेट ट्विट करू शकणार आहेत. म्हणजेच त्याखाली केलेले ट्विट फक्त तुमच्या सर्कलमधील लोकांनाच दिसेल. यामध्ये १५० लोकांचा समावेश असणार आहे.
फीचरबद्दल माहिती सांगताना ट्विटरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तुम्ही ‘ट्विटर सर्कल’ कसे वापरावे याबबात माहिती दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, सध्या ट्विटर सर्कलमध्ये केवळ १५० लोकांनाच समाविष्ट केले जाऊ शकते. हे फीचर इन्स्टाग्रामच्या ‘क्लोज फ्रेंड्स’ फीचरसारखे आहे. हे १५० लोक कोण असणार हे ठरवण्याचा सर्व अधिकार तुम्हाला असेल.
या फीचरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वर्तुळात केलेले ट्विट हिरव्या बॅजच्या आत दिसतील. हे ट्विट कोणीही रिट्विट किंवा शेअर करू शकणार नाही. या ट्विटवर दिलेले सर्व रिप्लाय खाजगी राहतील. “हे नवीन फिचर युजर्सना त्यांच्या ‘टाईमलाइन’वर प्रत्येकाशी बोलण्याचा पर्याय न सोडता त्यांच्या ‘फॉलोअर्स’शी चांगले संबंध निर्माण करण्यात मदत करेल,” असे कंपनीने म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









