कित्येक जुळ्या मुलांनी घेतला शाळेत प्रवेश
स्कॉटलंडच्या 32 कौन्सिल भागांपैकी एक इन्वरक्लाइडमधून एक चकित करणारी घटना समोर आली आहे. तेथे पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या शाळांमध्ये 34 जुळ्या मुलामुलींनी प्रवेश घेतला आहे. ही दुसऱ्या क्रमांकाची विक्रमी संख्या आहे. यापूर्वी 2015 मध्ये 38 जुळ्या मुलामुलींनी इन्वरक्लाइडच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला होता. या जुळ्या मुलांसंबंधी शाळा देखील विशेष उत्सुक असून नेक्स्ट वीकसाठी स्वत:ला तयार करत आहेत. जुळ्या मुलांमधील फरक ओळखणे अनेकदा अवघड असते. याचमुळे या शाळेतील शिक्षकांसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. या शाळेत 18 ऑगस्टपासून 34 जुळे मुलेमुली पी1 चे शिक्षण घेण्यास सुरुवात करणार आहेत. इन्वरक्लाइडमध्ये जुळ्या मुलांच्या उच्च दरामुळे याला ‘ट्विनवरक्लाइड’ म्हणूनही ओळखले जाते.
2023 मधील शैक्षणिक सत्र होण्यापूर्वी बहुतांश विद्यार्थी स्वत:च्या पहिल्या दिवसापूर्वी ‘ड्रेस रिहर्सल’साठी ग्रीनॉकच्या सेंट पॅट्रिक प्रायमरी स्कूलमध्ये एकत्र आले. कार्यक्रमात 34 पैकी 30 जुळे मुलेमुली हजर राहिले. ही सर्व मुले देखील स्वत:च्या शाळेसंबंधी अत्यंत आनंदी अन् उत्साही दिसून आली आहेत. सेंट पॅट्रिक इनवरक्लाइड या शाळेत सर्वाधिक संख्येत जुळ्या मुलांनी प्रवेश घेतला आहे. 2013-2023 पर्यंत या शाळेत 294 जुळ्या मुलामुलींनी प्रवेश घेतला आहे. जुळ्या मुलांचे प्रायमरी क्लासेसमध्ये स्वागत करणे आमची आता वार्षिक परंपरा ठरली आहे. पुढील आठवड्यात नव्या सत्राची सुरुवात होणार असल्याचे इनवरक्लाइड कौन्सिलचे अधिकारी ग्रीम ब्रूक्स यांनी म्हटले आहे.









