कोकण कन्या, मांडवी एक्सप्रेसचा समावेश : पाच गाड्या अंशत: रद्द काही गाड्यांच्या मार्गात बदल
मडगाव : मध्य रेल्वेच्या पनवेल – कळंबोली मार्गावर मालगाडीचे डबे घसरले. याचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीवरही झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोकण रेल्वे मार्गावरील 12 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय 5 गाड्या अंशत: रद्द तर तीन गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या पनवेल ते कळंबोली विभागात मालगाडीचे पाच डबे ऊळावऊन घसरले. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पावसामुळे रेल्वे मार्ग सुरळीत करण्यात अडचणी येत आहेत. या अपघातामुळे पनवेल ते दिवा ‘अप’ मार्गावरील वाहतूक बंद झालेली असली तरीही दिवा ते पनवेल ‘डाऊन’ मार्ग सुरक्षित आहे. त्यामुळे वेळापत्रकात बदल कऊन गाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर रोजी कोकण रेल्वे मार्गावऊन धावणाऱ्या तीन गाड्या तर 1 ऑक्टोबर रोजीच्या 9 अशा एकूण 12 गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. यात 07105 पनवेल-खेड मेमू, 01155 दिवा-चिपळूण मेमू, 01165 लोकमान्य टिळक टर्मिनस मंगळुऊ जंक्शन या 30 ऑक्टोबर रोजी धावणाऱ्या गाड्या रद्द केल्या आहेत. तर 01156 चिपळूण-दिवा मेमू, 07105 पनवेल-खेड मेमू विशेष, 07106 खेड-पनवेल मेमू विशेष, 10103 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव (मांडवी एक्स्प्रेस), 01171 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी विशेष गाडी, 20112 मडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (कोकणकन्या एक्स्प्रेस), 11004 सावंतवाडी दादर (तुतारी एक्स्प्रेस), 01172 सावंतवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष, 11099 लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव एक्स्प्रेस या 1 ऑक्टोबर रोजी धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पुढील गाड्या अंशत: रद्द : 07104 ही मडगाव ते पनवेल मार्गावर धावणारी गाडी रत्नागिरी स्थानकापर्यंत धावेल. रत्नागिरी ते पनवेल मार्ग रद्द करण्यात आला आहे. 01172 सावंतवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस धावणारी गाडी पनवेलपर्यंत धावेल. 01151 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव विशेष गाडी पनवेलवऊन सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलपर्यंत ही गाडी रद्द केलेली आहे. 01154 रत्नागिरी ते दिवा मेमू विशेष कासूपर्यंत धावेल. 01153 ही दिवा ते रत्नागिरी गाडी कासू या स्थानकावऊन सुटणार आहे.
लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या मार्गात बदल
कोकण रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गात बदल केलेले आहेत. 12450 चंदीगड ते मडगाव जंक्शनवर येणारी गोवा संपर्क क्रांती रेल्वे, 12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव जंक्शनवर येणारी जनशताब्दी रेल्वे, 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिऊअनंतपुरम सेंट्रलपर्यंत जाणारी गाडी कल्याण स्थानकावऊन मार्गात बदल करत पुणे, मिरज, लोंढामार्गे मडगाव जंक्शनवर येतील व त्यापुढील मार्गावर मार्गक्रमण करतील.









