कर्नाटकात गुंतवणूक : जागतिक केंद्राची करणार स्थापना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टीव्हीएस मोटर कंपनीने बुधवारी सांगितले की पुढील पाच वर्षांत कर्नाटकात 2000 कोटी रुपये गुंतवणार आहेत. क्षमता केंद्रे स्थापन करण्याची आणि उत्पादन वाढवण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीने सांगितले की कर्नाटक सरकारसोबतच्या करारानुसार, ते एक जागतिक क्षमता केंद्र स्थापना करणार आहेत. म्हैसूरमध्ये त्यांच्या उत्पादन आणि अभियांत्रिकी क्षमतांचा विस्तार करणार असल्याची माहिती आहे. तसेच एक चाचणी ट्रॅक तयार करुन कर्नाटक राज्यात एक नवीन पायाभूत सुविधा असणारे कार्यालय उभारण्यात येणार आहे.
टीव्हीएस मोटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू यांनी कर्नाटक गुंतवणूक शिखर परिषदेत 2025 ‘ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट’ (जीआयएम) मध्ये कंपनीच्या योजनांची रूपरेषा मांडली. वेणू म्हणाले, ‘आम्ही आमच्या 2030 च्या उद्दिष्टांकडे वाटचाल करत असताना, आम्ही आज बनवलेल्या योजना आम्हाला प्रभावी उपाय देण्यास आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढ करण्यास नवीन मानके स्थापित करण्यास मदत करतील.’ असेही ते म्हणाले.









