वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुचाकी क्षेत्रातील कंपनी टीव्हीएसने आपली नवी रोनीन मोटरसायकलची नवी सुधारीत आवृत्ती बाजारात दाखल केली आहे. या नव्या दुचाकीची एक्स शोरूम किंमत 1 लाख 72 हजार 700 रुपये इतकी असणार असून स्पेशल एडिशनच्या या दुचाकीचे रुप आकर्षक करण्यात आले आहे. या नव्या स्पेशल एडिशन मोटरसायकलमध्ये यूएसबी चार्जर, फ्लाय क्रीन देण्यात आली आहे. निंबस ग्रे या नव्या रंगांमध्ये मोटरसायकल लॉन्च करण्यात आली आहे. सदरची गाडी ही मागच्या वर्षी भारतीय बाजारामध्ये लॉन्च करण्यात आली होती. आता याच गाडीची सुधारित आवृत्ती बाजारामध्ये सादर केली असल्याचे टीव्हीएस मोटरने म्हटले आहे.









