बेळगाव : हायटेक टीव्हीएस व बेळगाव डिलर्सकडून एकाच दिवशी 100 आयक्मयूब इलेक्ट्रीक वाहने वितरित केली. त्यांनी इलेक्ट्रीक वाहन (ईव्ही) क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. नुकत्याच झालेल्या भव्य समारंभात, हायटेक मोटर्स अँड ऑटोमोबाइल्स प्रा. लि. व बेळगाव डिलर्सने 100 आयक्मयूब इलेक्ट्रीक वाहने (ईव्ही) वितरित करून इलेक्ट्रीक वाहन उद्योगातील मोठा टप्पा साजरा केला. टीव्हीएस मोटर्ससाठी ही महत्त्वपूर्ण कामगिरी होती. कंपनीने देशभरात 5 लाखांहून अधिक आयक्मयूब ईव्ही विकल्या आहेत. हा कार्यक्रम पै रिसॉर्ट्स येथे पार पडला. या कार्यक्रमात टीव्हीएसच्या ईव्ही विक्रीत हायटेक मोटर्सच्या उल्लेखनीय योगदानावर प्रकाश टाकण्यात आला. जानेवारी 2020 पासून 5,000 हून अधिक आयक्मयूब वाहने विकली आहेत. आता ‘टीव्हीएस ईव्ही’ विक्रीसाठी उत्तर कर्नाटकातील आघाडीचे डिलर म्हणून ओळखले जातात.
यावेळी टीव्हीएस मोटर्स, हायटेक मोटर्स आणि अक्षय टीव्हीएसमधील प्रमुख व्यक्ती, ग्राहक कुटुंबीयांसह उपस्थित होते. कर्नाटक आणि केरळसाठी टीव्हीएस ईव्ही विक्रीप्रमुख वैद्यनाथन उपस्थित होते. त्यांच्यासह टीव्हीएस सेल्स मॅनेजर लोहित व हायटेक मोटर्स अँड ऑटोमोबाईल्स प्रा. लि.चे संचालक राजेश भोसगी, राजेंद्र देसाई, बसवराज तंगडी व विनयकुमार बाळीकाई होते. वैद्यनाथन यांनी हायटेक मोटर्सच्या संचालकांचे त्यांच्या उत्तम कामगिरी आणि समर्पणाबद्दल अभिनंदन केले. भविष्यात नवीन टप्पे गाठण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. हायटेक मोटर्सने या प्रदेशात टीव्हीएस ईव्हीच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे नमूद करून आम्हाला त्यांच्या कामगिरीचा अभिमान आहे आणि आणखी मोठे यश पाहण्याची आम्हाला उत्सुकता आहे, असे सांगितले.
हायटेक मोटर्सचे संचालक राजेंद्र देसाई यांनी टीव्हीएस वाहनांवर सतत विश्वास ठेवल्याबद्दल सर्व ग्राहकांचे आभार मानले. त्यांनी ग्राहकांना उच्च दर्जाची ग्राहक सेवा प्रदान करण्याच्या हायटेक मोटर्सच्या वचनबद्धतेची खात्री दिली. आमच्या निष्ठावंत ग्राहकांच्या पाठिंब्याशिवाय हा टप्पा शक्मय झाला नसता. आम्ही ग्राहकांच्या समाधानाला प्राधान्य देत राहू आणि टीव्हीएस ईव्हीसह त्यांचा अनुभव अपवादात्मक असेल याची खात्री करू, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला अनेक ग्राहक उपस्थित होते. हा कार्यक्रम भारतातील इलेक्ट्रीक मोबिलिटीकडे वाढत्या टेंडची आठवण करून देणारा ठरला, ज्यामध्ये टीव्हीएस ईव्ही क्षेत्रात आघाडीवर आहे. आणखी 100 आयक्मयूब वाहनांच्या वितरणासह टीव्हीएस मोटर्स इलेक्ट्रीक वाहन बाजारपेठेत आघाडीचे स्थान मजबूत करत आहे.









