चोरट्याची छबी सीसीटीव्हीत कैद
बेळगाव : चेंबरवरील झाकण चोरणाऱ्या एका तरुणाची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. टीव्ही सेंटर परिसरातील या प्रकाराचे फुटेज उपलब्ध झाले असून झाकण चोरीच्या घटनांनी स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. अॅड. एम. के. पवार यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चेंबरवरील झाकण चोरणाऱ्या तरुणाची छबी कैद झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून झाकण चोरीचे प्रकार या परिसरात सुरू आहेत. स्थानिक पोलिसांना माहिती देऊनही यासंबंधी कोणतीच कारवाई झाली नाही. झाकण चोरणारा तरुण पोलिसांना सापडला नाही. झाकण चोरल्यानंतर दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचा शोध घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.









