हिंडलगा : आसाम येथे होणाऱया 37 व्या राष्ट्रीय ऍथलेटीक्स स्पर्धेसाठी भरतेश महाविद्यालयाचा विद्यार्थी तुषार भेकणे याची कर्नाटक संघात निवड झाली आहे.
आसाम येथे 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान होणाऱया 37 व्या राष्ट्रीय ऍथलेटीक्स स्पर्धेत भरतेश महाविद्यालयाचा विद्यार्थी तुषार भेकणे याची 800 मी. धावणे व 1500 मिटर धावणे या दोन क्रीडा प्रकारात भाग घेणार आहे. त्याची कर्नाटक संघात निवड झाली आहे. तो मण्णूर गावचा उगवता धावट्टू असून त्याला स्टँडर्ड क्लबचे प्रशिक्षक प्रदीप जुवेकर, शिरीष सांबरेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तर वडील वसंत भेकणे यांचे प्रोत्साहन लाभत आहे. तुषारची आसामच्या स्पर्धेसाठी तो रवाना झाला आहे.









