सावंतवाडी । प्रतिनिधी
संस्थानकालीन मोती तलावात विविध प्रकारचे जलचर प्राणी आढळतात. मगरीचे साम्राज्य या तलावात पाहायला मिळते. पण ,यापेक्षाही आगळ्यावेगळ्या धर्तीचा कधी न पाहिला असा अनोखा कासव अनेकांच्या दृष्टीस पडला आहे. हा कासव पहिल्यांदाच या तलावात दिसताच अनेक जलचर प्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे . कासवाची प्रजाती मुख्यतः तलाव , साचलेले पाणी तसेच नदीमध्ये पाहायला मिळते. विहिरीमध्ये कासव सोडण्याची प्रथा आहे. मात्र मोती तलावात राणी पार्वती देवी हायस्कूलच्या परिसरातील तलावाकाठी हा अनोखा कासव दृष्टीस पडत आहे. नेमका हा कासव कुठल्या प्रजातीचा आहे याचे संशोधन जलचर अभ्यासक यांनी करावे अशी मागणी होत आहे.हा कासव सर्वप्रथम सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पेडणेकर यांच्या दृष्टीस पडला असून त्यांनी याबाबत अनेक जलचर अभ्यासकांशी चर्चाही केली आहे .









