दापोली :
तालुक्यातील आंजर्ले येथे वनविभाग महाराष्ट्र शासन, कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान, सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण, आंजर्ले ग्रामपंचायत, कांदळवन सहव्यवस्थापन समिती आंजर्ले आणि कासव मित्र यांच्यावतीने 10 एप्रिल ते 10 मे या कालावधीत कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
समुद्री आलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या संरक्षित करण्यात आलेल्या अंड्यांतून पिल्ले बाहेर पडण्यास प्रारंभ झाला आहे. या छोट्या पिल्लांचा जन्मोत्सव म्हणून आंजर्ले येथे कासव महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. यात एप्रिल ते मे महिन्यात पर्यटकांची गर्दी मोठी असते. यामुळे हा जन्मोत्सव पर्यटकांना देखील अनुभवता येणार आहे.








