कोल्हापूर :
सतेज कृषी प्रदर्शनाच्या दूस्रया दिवशी शेतकरी बांधवांसह नागरिकांनी अलोट गर्दी केली. प्रदर्शनामध्ये अडीचे कोटीहून अधिक आर्थिक उलाढाल झाली. गिरगाव येथील जितेंद्र पाटील यांचा चारदाती 1260 किलो वजनाचा म्रुहा जातीचा बाहुबली हा नामवंत रेडा या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहे. तसेच कागल येथील हैदर भाई फार्म अमेरीकन 18 इंचाचे बोकड, वर्षाला 300 अंडी देणारी ब्लॅक ऑस्ट्रेलियन कोंबडी यामध्ये विशेषत विदेशी भाजीपाला जुकेनिया काकडी,कागल येथील फुटबॉल आकाराचा पपई, नागदेववाडीतील 25 किलो वजनाचा केळी घड, सात किलोचा भोपळा,लांब पपई आणि पाच किलो वजनाचा भला मोठा कोबी प्रदर्शनाचे ठरत आहेत आकर्षण ठरत आहेत.
प्रदर्शनात मातोश्री फार्म हाऊस गिरगाव फाटा येथील जितेंद्र पाटील यांचा चारदाती 1260 किलो वजनाचा म्रुहा जातीचा बाहुबली हा नामवंत रेडा या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहे. त्यापासून झालेल्या अपत्याचे वजन हे 60 किलोच्या पुढे आहे तर म्हैशीचे दूध 22 लिटर इतके आहे .बाहुबली रेडा दिवसाला दहा लिटर दूध पितो, तीन किलो हरभरा डाळ खातो ,पावशेर तूप,5 अंडी, चंदी आणि मुरघास खातो. . त्याची उंची 5.6 इंच आहे लांबी 8.8 इंच आहे. कागल येथील हैदर भाई फार्म अमेरीकन 18 इंचाचे बोकड, वर्षाला 300 अंडी देणारी ब्लॅक ऑस्ट्रेलियन कोंबडी प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे.याचबरोबर गडहिंग्लज येथील हसुरचंपू गावातील स्वप्निल पवार यांचा तेराशे 1360 किलो वजनाचा युवराज रेडा जो 38 महिन्याचा आहे तोही आकर्षण ठरत आहे.

विदेशी भाजीपाला जुकेनिया काकडी,कागल येथील फुटबॉल आकाराचा पपई, नागदेववाडीतील 25 किलो वजनाचा केळी घड, सात किलोचा भोपळा, लांब पपई आणि पाच किलो वजनाचा भला मोठा कोबी, चिंचवाड शिरोळ येथील नागेंद्र घाटगे यांचा लाल कोबी, नांदणी शिरोळ येथील गेट्स फुल राशिवडे येथील जरबेरा फुले निशिगंध, बेले येथील 978 वान असलेला दोडका प्रदर्शनाचे ठरत आहेत आकर्षण
विदेशी भाजीपाला व स्थानिक भाजीपाला, चेरी टोमॅटो सुळकुड येथील एक किलोचे भरताचे वांगे बारवेक काळी वांगी,गडहिंग्लज येथील आनंदा कानडे यांची कलर कॅप्सिकम रंगीत ढबु मिरची खास आकर्षण. विविध कंपन्यांची उत्पादने, विविध प्रकारची ट्रॅक्टर्स मांडण्यात आली आहेत. भाजीपाला, फुले, शेतीविषयक डेमो, शेततळे आदींचा समावेश असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तपोवन मैदानावर मोठी गर्दी केली आहे. प्रदर्शनात दुसऱ्या दिवशी एकूण दोन कोटीच्या आसपास उलाढाल ही झाली आहे.
आज प्रदर्शन स्थळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी भेट दिली.सायंकाळी याठिकाणी जावेद नायकवडी कोल्हापूर यांचा सरगम कराओंके हा गाण्यांचा संगीत गायन कार्यक्रम संपन्न झाला.
प्रदर्शनात जनावरे ठरत आहेत आकर्षण
मसाई पठार येथील केदारलिंग देशी गोवंश गो शाळेतील सात वर्षाचा सागर महाडिक यांचा वळू, पाच वर्षाचा काटेवाडी जातीचा शाहू घोडा. दरडेवाडी तालुका आजरा येथील सर्जा, आणि चार वर्षे सहा महिन्याचु साहिवाल कपिला गीर गाय., कोल्हापुरातील मंदार इंगवले यांचा भुत्या हा घोडा जो आंघोळ घातल्यानंतर ओला झाल्यावर काळा दिसतो आणि वाळला की पांढरा दिसतो. कागल मधील हैदर अली यांचा ब्रँड ब्रिडिंग फार्म मधील पांढरे रंगीबेरंगी कबुतरे, ससे, मांजर, बदक, पांढरे उंदीर, राजहंस, लवबर्ड, पोपट आदी प्रदर्शनात आली आहेत.
आज होणारी व्याख्याने
ऊस/केळी पिकासाठी ठिबक सिंचन गरज, काळजी, देखभाल व खत व्यवस्थापन: वरिष्ठ कृषीविद्यावेता सुरेश मगदूम
मुरघास तंत्रज्ञ व सेक्सेल सिमेंन: चंद्रशेखर कुलकर्णी, डॉ सतीश कोगनुळे.
दोन दिवसात विक्री झालेला शेतमाल :
1) सेंद्रीय गूळ : 1000 कि
2) इंद्रायणी तांदूळ : 2200 कि
3) आजरा घनसाळ : 2000 कि
4) सेंद्रीय हळद : 500 कि
5) नाचणी : 400 कि








