Turkey and Syria Earthquake : तुर्की आणि सीरियाच्या लोकांनी सोमवारी पाहिलेले विध्वंसाचे दृश्य अनेक दशकांपर्यंत वेदना देणारे आहे. भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 4890 लोकांनी आपला जीव गमावला आहे. या भूकंपाची तीव्रता 7.8 इतकी होती. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की हजारो इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. तुर्की प्रशासनाचे म्हणणे आहे की आतापर्यंत 5606 इमारती कोसळल्या आहेत. हेच विध्वंसाचे दृश्य सीरियातही पाहायला मिळाले आहे.दोन्ही देशात झालेला विध्वस ऱ्हदय पिळवटून टाकणारा आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत सरकार मदत करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार भारतीय वायुसेनेचे C-17 विमान बचाव पथक मदतीचे साहित्य घेवून तुर्कस्तानला रवाना झाले आहे.














