Turkey Syria Earthquake : तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत एकूण 8000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 7.8 तीव्रतेच्या भूकंपामुळे येथाल इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या आहेत.आतापर्यंत 435 भूकंपांची नोंद झाल्याची माहिती तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
भूकंपानंतर मदत आणि बचाव कार्यासाठी आतापर्यंत एकूण 60,217 कर्मचारी आणि 4,746 वाहने आणि बांधकाम उपकरणे तैनात करण्यात आली आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार असोसिएटेड प्रेसने तुर्की आणि सीरियामध्ये शक्तिशाली भूकंपांमुळे आतापर्यंत 7,700 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.
तुर्कस्तानमधील भूकंपानंतर जगभरातील देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे, एकूण 70 देशांचे पथक मदत आणि बचाव कार्यासाठी तुर्कीमध्ये पोहोचले आहे. पण तुर्कस्तानचे खराब हवामान मदत आणि बचावासाठी अडथळा ठरत आहे. भारतानेही तुर्कीला मदत पोहचवली आहे. यामध्ये आरोग्य विभागाचे पथक, एनडीआरएफच्या तुकड्या देखील पाठवल्या आहेत. आतापर्यंत 30 खाटांचे फील्ड हॉस्पिटल, वैद्यकीय तज्ज्ञ आणि 99 कर्मचारी ,100 हून अधिक लष्करी जवान तसेच सीरियात मदत सामग्री पाठवली आहे. यामध्ये 6 टन पेक्षा जास्त मदत सामग्रीचा समावेश आहे ज्यात 3 ट्रक सामान्य आणि संरक्षणात्मक उपकरणे, आपत्कालीन वापरासाठी औषधे,सिरिंज आणि ECG मशीन, मॉनिटर्स आणि इतर आवश्यक वैद्यकीय पुरवठा आणि उपकरणे आहेत.
Previous Articleखाण लीज लिलाव प्रक्रियेला ‘ब्रेक’ लागणार?
Next Article ग्रामस्थ-सरकार यांच्यातील दुवा बना : मुख्यमंत्री









