वृत्तसंस्था/ माद्रीद (स्पेन)
डब्ल्युटीए टूरवरील येथे झालेल्या माद्रीद खुल्या मास्टर्स 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत टय़ुनिशियाच्या ऑन्स जेबॉरने महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा पराभव केला. डब्ल्युटीए मास्टर्स 1000 टेनिस स्पर्धा जिंकणारी जेबॉर ही पहिली अरब महिला टेनिसपटू आहे.
शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 27 वर्षीय जेबॉरने अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा 7-5, 0-6, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव केला. जेबॉरला विजयासाठी तब्बल दोनतास झगडावे लागले. डब्ल्युटीए टूरवरील स्पर्धेतील जेबॉरचे हे दुसरे विजेतेपद आहे.









