सांखळी/प्रतिनिधी
सांखळी मतदारसंघात शहर तसेच ग्रामीण भागात वर्ष पद्धती प्रमाणे यंदाही तुळशीविवाह सण उत्सहात साजरा करण्यात आला.या निमित्त घरोघरी तुळशीविवाह करण्यात आले.यावेळी विधुत रोषणाई करण्यात आली होती. पणत्या पेटवून परिसर सजवण्यात आला होता.
सांखळी शहरात ही यंदाही तुळशी वृ?दावन आकर्षक सजवण्यात आली होती.परिसरात आकर्षक विधुत रोषणाई करण्यात आली होती. सांखळी बाजार, गोकुळवाडी, गावठण,मावळीगतड,देसाई नगर, गृहनिर्माण वसाहत, विर्डी, वजरी,बंदरवाडा,विठ्ठल पूर तारानगर, प्रतापनगर इत्यादी परिसरात तुळशी विवाह साजरा करण्यात आला.
सांखळी मतदारसंघात पाळी, वेळगे, सुर्ला,कुडणे, आमोणा,न्हावेली, हरवळे परिसरातील घरोघरी तुळशी विवाह धार्मिक पध्दतीने साजरा करण्यात आला.
आपली संस्कृती आणि सर्व उत्कृ÷ जोडी नेहमीच प्रकाशित राहावी यासाठी आजही सुहासिनी महिला तुळशीवृ?दावन जवळ बसून जोडय़ा पेटवत असतात.









